Posts

Featured post

मने जुळली नाहीत म्हणून..

  मने जुळली नाहीत म्हणून शब्द जुळवण्याचा प्रयत्न करत आहे पण आजकाल ते ही एकमेकांशी जुळत नाहीत कदाचीत त्यांनाही अहंकार आड येत असावा... काही शब्द बोल्ड आहेत ठाम आहेत त्यांच्या विचारांवर तर काही आहेत इटॅलिक स्वच्छंदी, प्रवाहानुसार बदलणारे आणि अंडरलाईन मात्र दोघांना हवीय स्वतःच महत्व अधोरेखीत करण्यासाठी पण त्यांच्या या खेळात कविता मात्र भरकटलीय ... काही शब्द कर्सिव्ह इंग्लिश आहेत त्यांची सामाजिक किंमत जास्त आहे तर काही आहेत मराठी देवनागरी लिपीतील आपलेपणा ठासून भरलेला आहे त्यांच्यात पण त्यांच्या मिलनात काहीतरी मिसिंग वाटते नैसर्गिकपणा नसल्यावर गोष्टी निर्जीव वाटायला लागतात ... काही शब्द सरळ आहेत, ना काना ना मात्रा पण त्यांना त्याची पर्वा नाही तर काही शब्द आहेत, वेलांटी आणि उकारयुक्त पण त्यांना आस लागलीय जोडशब्द बनण्याची अशा वेळी त्यांच्या एकत्र येण्याने, व्याकरण मात्र फिकं पडतंय ... काही शब्द नामें आहेत स्वतःची ओळख त्यांनी जपली आहे तर काही शब्द ही सर्वनामे आहेत अवलंबून तर रहावं लागतं त्यांना नामांवरच पण त्यांच्या सोबत बसायला मात्र त्यांना जागा नाही ... - आशिष दहातोंडे (२६ जानेवारी २०१९)

मी बुद्ध आहे काळोखाचा

मी बुद्ध आहे काळोखाचा अज्ञानातील सुख माझ्या नशिबी नाही कळत नकळत अनेक मनं दुखावलीत माझ्या अश्रूंची कर्ज दुसऱ्यांनी चुकवलीत भूतकाळातल्या चुका दुरुस्त करायला भविष्याचा वेध घेतोय भविष्याची चिंता भूतकाळातल्या आठवणींमध्ये विसरतोय वर्तमानामध्ये मी जगत नाही... स्वप्नांना प्रश्न विचारून निरुत्तर केलय संथपणे विचारांचा रवंथ करून स्वप्नांना तिलांजली वाहिलीय अनेक कविता मनामध्ये विरून श्रेष्ठत्वाला पावल्या आज तिला कागदावर उतरवून तिचीपण किंमत कमी करतोय कडवी जुळवण्याची आता इच्छा होत नाही कविता आणि आयुष्याचं यमक जुळवण्याची तसदी मी आता घेत नाही आयुष्याच्या तुटलेल्या आरशावर स्वतःची अनेक प्रतिबिंबे दिसतात त्यातलं खरं प्रतिबिंब कोणतं, हेच आता कळत नाही... - आशिष दहातोंडे (रावण)

नाते...

बहिण भावाचे नाते, आहे मोठे गमतीचे, काटा भावाला टोचतो, पाणी तिच्या डोळा येते... खेळताना हसताना, घरभर नाचताना, रागे रागे कधीतरी भांडशील ना, लटकेच खुदकन हसशील ना... सुगरण माझी ताई, अन दादा मी शहाणा, घर घेतो डोईवर, ताई दादाचा धिंगाणा, तुझ्यासवे खेळताना, डावामध्ये हरताना, दादा तुझा रडवेला पहाशील ना, रागे रागे कधीतरी भांडशील ना... माझी बहीण बहीण लाड माझे पुरवीते, माझ्या वेदना पुसण्या माझी आई कधी होते, घरामध्ये राबताना, आवडे तू सकलांना, मनामध्ये माझ्या सुद्धा रहाशील ना, रागे रागे कधीतरी भांडशील ना... आज राखी बांधताना ताई मला ओवाळते, गंध लावते कपाळी माझे आयुष्य वाढते, तोंड गोड करताना, ताट हळू फिरताना, काय होते मागीतले सांगशील ना, रागे रागे कधीतरी भांडशील ना... अंकुरले एका ठाई तुझे माझे बालपण , घेऊ वाटून दोघांत तुझी माझी आठवण, पाठ तुझी राखताना ऋण थोडे फेडताना, बाहुमध्ये माझ्या बळ देशील ना, रागे रागे कधीतरी भांडशील ना... अशी माझी ताई गुणी माझ्या घरी मोठी होते, कष्ट सोसता सोसता तिच्या सासरला जाते, वाट तुझी पहाताना भाऊबीज घालताना, ओलावले डोळे माझे पुसशील ना, रागे

तुझ्या आठवणीचं रोपटं...!

तू सोडून गेल्यावर तुझ्या आठवणीत प्रिये, अंगणात एक रोपटं लावलंय मी तुला लावायचो तसा आता त्याला जीव लावतो मी.. त्याची पानं तुझ्या मऊ बोटांसारखी आणि त्याची पालवी तुझ्या गोड गालावरच्या खळीसारखी भासते मला पहाटे पहाटे त्याच्या पानांवर पडलेले दवबिंदू अगदी मोत्यांसारखे भासतात आणि पानांवरचे ते मोती खरंच, तुझ्या टपोऱ्या डोळ्यां सारखे दिसतात त्याच्याशी बोलताना भान रहात नाही तुझ्याशी बोलताना राहायचं नाही अगदी तसं आणि तुझ्यापासून दूर असल्यावर जसा जीव कासावीस व्हायचा तसाच होतो त्याच्यापासून दूर असतानाही त्याला आपल्या गमती सांगतो मी तसं ते खुलतं तुझ्या आठवणीच्या अश्रूंनी त्याची माती भिजवतो तसं ते फुलतं त्याच्याशी चांगली गट्टी जुळलीये आता सहसा तुझी आठवणही येत नाही हल्ली तरी सुद्धा माझ्यासाठी नाही, पण त्याच्यासाठी एकदा येऊन जाशील तू? तुझ्या ओठांसारख्या त्याच्या कळीला एकदा पाहून जाशील तू? - प्रतीक कुंडलीक शिंदे (१४ जून २०१९) www.facebook.com/PatrickWritesLife                                        

A 2.43 a.m. thought...

If you don't have a single person to talk when you're broke.. you've been doing it wrong, kid..

आईचं पत्र.. (बाळा तुझी आठवण येतेय...)

        Hi, कसा आहेस? जेवण केलं? काय खाल्लं? तब्येत बरीये ना? तब्येतीची काळजी घे. बाहेरचं खात जाऊ नकोस. Call करत रहा. एवढ्या प्रश्नांमध्ये कळूनच गेलं असेल की मी कोण आहे.         खूप दिवस झाले आपलं बोलणंच नाही झालं. म्हणजे मी call करते, पण तू busy असतोस. मग म्हणलं चला, बाळाला एक पत्रच लिहावं. म्हणजे तुला वेळ मिळाला तर वाचताही येईल आणि bore झालं की ठेऊनही देता येईल, मला वाईट न वाटता. हो म्हणजे bore होतं ना तुला आजकाल आपलं बोलणं... मी बडबड करत रहाते आणि तुला Important कामं असतात... मी ठेऊन देते मग फोन आणि बोलत रहाते तुझ्याशी... तासनतास... या सगळ्या बडबडीतून, या बोलण्यातून फक्त एकच सांगायचं असतं रे की, बाळा आठवण येतेय तुझी.. तुझी खूप, खूप आठवण येतेय...         बाळा जेव्हा तुझी चाहूल लागली होती ना, पहिल्यांदा.. तेव्हा कोणालातरी पाहिलेलं नसतानाही प्रेम होऊ शकतं यावर माझा विश्वास बसला. तू दिसशील कसा, तू असशील कसा, एवढंच काय तू मुलगा असशील की मुलगी हे सुद्धा मला ठाऊक नव्हतं. तरी माझं नितांत प्रेम होतं तुझ्यावर. माझ्या शरीराचाच नाही, तर काळजाचाही भाग होता तू. आधी खाण्याच्या बाबतीत बिलकुल com

Grow up..

        Guys grow up..! At this age, you know your friends are not really your friends and people you hate are not really your enemies. No matter how much you promise, you're not going to see your Friends for years. You're not going to see some of them for life.         Get out of all the unnecessary emotional drama going on. The time is not far when you'll look back and regret all the futile things you're doing now. Nothing stays for life. Stop investing time in count erproductive things.         Don't get stressed. You know Everything settles down and everything works out. Don't remain attached to things which no more makes you happy. Better be bitter. Don't suffer unnecessarily just to be a good person.         You're at the stage of life where you can draw infinite possibilities for yourself. Whatever you want to do, do it now. Don't curse yourself for not doing something, rather do it now. Don't curse yourself for doing something, Y