तुझ्या आठवणीचं रोपटं...!

तू सोडून गेल्यावर
तुझ्या आठवणीत
प्रिये, अंगणात एक रोपटं लावलंय मी

तुला लावायचो
तसा आता त्याला जीव लावतो मी..
त्याची पानं
तुझ्या मऊ बोटांसारखी
आणि त्याची पालवी
तुझ्या गोड गालावरच्या खळीसारखी भासते मला

पहाटे पहाटे त्याच्या पानांवर पडलेले दवबिंदू
अगदी मोत्यांसारखे भासतात
आणि पानांवरचे ते मोती
खरंच, तुझ्या टपोऱ्या डोळ्यां सारखे दिसतात

त्याच्याशी बोलताना
भान रहात नाही
तुझ्याशी बोलताना राहायचं नाही अगदी तसं
आणि तुझ्यापासून दूर असल्यावर
जसा जीव कासावीस व्हायचा
तसाच होतो
त्याच्यापासून दूर असतानाही

त्याला आपल्या गमती सांगतो मी
तसं ते खुलतं
तुझ्या आठवणीच्या अश्रूंनी
त्याची माती भिजवतो
तसं ते फुलतं

त्याच्याशी चांगली गट्टी जुळलीये आता
सहसा तुझी आठवणही येत नाही हल्ली
तरी सुद्धा
माझ्यासाठी नाही, पण त्याच्यासाठी
एकदा येऊन जाशील तू?
तुझ्या ओठांसारख्या त्याच्या कळीला
एकदा पाहून जाशील तू?

- प्रतीक कुंडलीक शिंदे (१४ जून २०१९)
www.facebook.com/PatrickWritesLife
                                          www.instagram.com/patrick.writes

Comments

Popular posts from this blog

मने जुळली नाहीत म्हणून..

मी बुद्ध आहे काळोखाचा