ती जेव्हा सांगून येते...

जी मला सांगून येते, ती तेव्हा कोरी असते,
मी तिला कवेत घेतो, आणि ती माझी होते....

आता प्रेत्येकीलाच नकार देणं, तसं जीवावर येतं,
पण होकार दिला की तिथं राबावं लागतं,
खरंच कधी उशिरापर्यंत, ती मला जागवते,
मी तिला कवेत घेतो, आणि ती माझी होते...

कधीकधी तिच्यासवे अनेक असतात, त्यांचं टोळकं येतं,
अन टीचकुल्या करीत माझ्याभोवती, झगरं घालून बसतं,
अहो, येणारी प्रत्येक सुंदरी जणू अप्सरा असते,
मी तिला कवेत घेतो, आणि ती माझी होते...

तसं मी प्रत्येकीवर, सारखंच प्रेम करतो,
माझ्या ओसरीत तिनं सजावं, फुलावं म्हणून मी मरतो,
माझ्या तुटपुंज्या शब्दफुलांनी, तिची ओटी भरली जाते,
मी तिला कवेत घेतो, आणि ती माझी होते...

खरंतर ती तीच असते, काळाच्या ओघात बदलत जाते,
हळव्या मनांच्या चाकावर, फिरता फिरता आकार घेते,
जीवाशी जीव जडवला कि, अशी ती साकार होते,
मी तिला कवेत घेतो, आणि ती माझी होते...

रसिकहो आता मी ही बराच सरावलो आहे,
तिच्या निरेला हात घालण्या सरसावलो आहे,
आता जेव्हा ती सांगून येते, तेव्हा लाजून चूर होते,
मी तिला कवेत घेतो, आणि ती माझी होते...

                           - कुंडलिक शिंदे (02 एप्रिल 1990)
                                               www.facebook.com/pratik780
                                               www.facebook.com/PatrickWritesLife
                                               www.twitter.com/patrick0780
                                               www.instagram.com/patrick.writes

Comments

  1. कल्पनेची इतकी सुंदर कल्पना...👌👌
    Hats Off To Poet..👏👏👏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मने जुळली नाहीत म्हणून..

मी बुद्ध आहे काळोखाचा