आता कशाला...
अश्रुंचे प्राशीत प्याले,
जळणे आता कशाला,
तिमिरात साऊलीला,
शोधणे आता कशाला...
ठेचाळल्या भावनांना,
काळोखात पोसले मी,
परसात चांदण्यांचे,
शिंपणे आता कशाला...
हृदयात आसवांची,
दारे सताड उघडी,
स्वप्न गोडवे चिंबले,
पहाणे आता कशाला...
देहाचे सिंचन झाले,
वाट तरीही सुकल्या,
तुडविले काटे 'तेव्हा',
बोचणे आता कशाला...
कान आतुरले होते,
दारी तिष्टत राहिलो,
चितेवरी देह गेला,
भुंकणे आता कशाला...!!
- कुंडलिक शिंदे (१९ ऑक्टोबर १९९०)
www.facebook.com/pratik780
www.facebook.com/PatrickWritesLife
www.twitter.com/patrick0780
www.instagram.com/patrick.writes
जळणे आता कशाला,
तिमिरात साऊलीला,
शोधणे आता कशाला...
ठेचाळल्या भावनांना,
काळोखात पोसले मी,
परसात चांदण्यांचे,
शिंपणे आता कशाला...
हृदयात आसवांची,
दारे सताड उघडी,
स्वप्न गोडवे चिंबले,
पहाणे आता कशाला...
देहाचे सिंचन झाले,
वाट तरीही सुकल्या,
तुडविले काटे 'तेव्हा',
बोचणे आता कशाला...
कान आतुरले होते,
दारी तिष्टत राहिलो,
चितेवरी देह गेला,
भुंकणे आता कशाला...!!
- कुंडलिक शिंदे (१९ ऑक्टोबर १९९०)
www.facebook.com/pratik780
www.facebook.com/PatrickWritesLife
www.twitter.com/patrick0780
www.instagram.com/patrick.writes
Mast... 🙌
ReplyDeleteThanks :)
Delete🤘🤘really meaningfull
ReplyDeleteThanks :)
Delete👌👌
ReplyDeleteThanks :)
Delete