काहूर..

        ..."अरे जरा बाजूला सरक ना.. अक्कल नाही का थोडीशी..." असं म्हणत लाथेनेच त्याला बाजूला करत गर्दी पुढे जात होती.. तो सुद्धा लाथ मारणाऱ्या देहांकडेच केविलवानेपणे पहात मदतीची याचना करत होता.. दोन दिवस झाले पोटात अन्नाचा एक कण देखील गेला नव्हता.. घशाला कोरड पडली होती.. शरीरभर झालेल्या जखमांचा जणू आता त्याला विसरच पडला होता.. अशातच कोणीतरी समोर दोन रुपयांचं नाणं फेकलं, आणि त्या देवरुपी चेहऱ्याकडे बघताच म्हाताऱ्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला..
        "सुरेश..." म्हाताऱ्याने मोठयाने हाक मारली.. त्या हाकेने बावरलेल्या सुरेश ने मागे वळून पाहिले, आणि त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.. "सर तुम्ही?? अशा अवस्थेत??" क्षणभरातच म्हाताऱ्याच्या डोळ्यात लाचारीच्या जागी करुणा आली.. सुरेश ने सरांना सावरलं आणि त्यांची विचारपूस केली.. मुलाने घराबाहेर काढल्याची आणि नातेवाईक, मित्रपरिवाराने धुतकारल्याची विदारक कहाणी ऐकताना सुरेशच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.. म्हाताऱ्याला मदत करण्यासाठी सुरेशने ताबडतोब खिशात हात घातला.. जिथे रक्ताचं नातं उपकार विसरलं तिथे कोणा परक्याचं प्रेम पाहून म्हाताऱ्याला गहीवरून आलं आणि सुरेशला मिठी मारून तो ओक्साबोक्शी रडायला लागला.. सुरेशने दिलेल्या पैशांना नकार देऊन म्हाताऱ्याने त्याला वाटेला लावलं आणि लाचारीची लक्तरं वेशीला टांगून विस्कटलेल्या आयुष्याचं काहूर डोळ्यात घेऊन पुन्हा एकदा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे म्हातारा भीक मागू लागला...!!

                                   -प्रतीक कुंडलीक शिंदे (१२ एप्रिल २०१८)
                                      www.instagram.com/patrick.writes
                                      www.facebook.com/pratik780
                                      www.facebook.com/PatrickWritesLife
                                      www.twitter.com/patrick0780

Comments

  1. Very touching.. Nice.. Being writer is not just about arranging heavy words.. It takes a sensitive heart to feel everything..
    It's not words that drop from your pen but the pain that drops from your words.. .keep it up Man 😇😉

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मने जुळली नाहीत म्हणून..

मी बुद्ध आहे काळोखाचा