उसवलेला बाप...

आईसारखा नऊ महिने
नसेलही वाढवत पोटात तो
पण ICU च्या बाहेर ओंजळीत तोंड खुपसून बसलेला बाप पाहिलाय का..?
        तुम्ही कधी उसवलेला बाप पाहिलाय का..??

चिऊ काऊ म्हणून घास भरवायला
नसेलही वेळ भेटत त्याला
पण त्याच बाळाच्या भविष्यासाठी
दिवसरात्र काम करणारा बाप पाहिलाय का..?
        तुम्ही कधी उसवलेला बाप पाहिलाय का..??

गोष्टींमध्ये ऐकल्यासारखा
नसेलही अंघोळीच्या साबणाने दाढी करत
पण कॉलेजची फी भरताना पैसे उसणे मागणारा बाप पाहिलाय का..?
        तुम्ही कधी उसवलेला बाप पाहिलाय का..??

एरवी राकट आणि अरसिक
वाटतही असेल स्वभाव त्याचा
पण त्यानेच लिहिलेल्या जुन्या कविता
आवडीने वाचणारा बाप पाहिलाय का..?
        तुम्ही कधी उसवलेला बाप पाहिलाय का..??

कमी मार्क्स मिळाले म्हणून
ओरडलाही असेल कितीदा तुमच्यावर
पण तुमच्या admission च्या tension ने
रात्रभर येरझरे घालणारा बाप पाहिलाय का..?
        तुम्ही कधी उसवलेला बाप पाहिलाय का..??

त्याच्या मनात असलेलं प्रेम
नसेलही दाखवत कदाचीत तो
पण मुलीच्या लग्नात
धुमसून धुमसून रडणारा बाप पाहिलाय का..?
        तुम्ही कधी उसवलेला बाप पाहिलाय का..??

आयुष्यभर कठीण आणि कणखर
वाटतही असेल तो तुम्हाला
पण वृद्धाश्रमात बसलेला
लाचार बाप कधी पाहिलाय का..?
        तुम्ही कधी उसवलेला बाप पाहिलाय का..??

                                   -प्रतीक कुंडलीक शिंदे (२७ मार्च २०१८)
                                      www.facebook.com/pratik780
                                      www.facebook.com/PatrickWritesLife
                                      www.twitter.com/patrick0780
                                      www.instagram.com/patrick.writes

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मने जुळली नाहीत म्हणून..

मी बुद्ध आहे काळोखाचा