माळरान
शोधू कसा किनारा, मी एकटाच आहे,
आता हवा सहारा, अंधुक वाट आहे...
माहेर सोडताना, पंखात ऊब होती,
तोंडात घास माझ्या, डोळ्यात आस होती,
झेपलेला आकाशी, पक्षी मोकाट आहे,
आता हवा सहारा, अंधुक वाट आहे...!!
त्याला कसे कळावे, गर्भात देह ज्याचा,
नाही तुझे कुणी वा, नाही तुही कुणाचा,
रे तुझ्या आसवांचा, पाझर तूच आहे,
आता हवा सहारा, अंधुक वाट आहे...!!
वाटे उगी कळीला, मी एकदा फुलावे,
शोधीत भ्रमरांना, वाऱ्यासवे उडावे,
सुकल्या पाकळ्या या, दु:खित गात आहे,
आता हवा सहारा, अंधुक वाट आहे...!!
जीवनात कधी कुणाच्या, वेळा अशा न याव्या,
हसता हसता पहाटे, सांजा इथे न व्हाव्या,
उरलो जरी सखे मी, नुसताच भास आहे,
आता हवा सहारा, अंधुक वाट आहे...!!
- कुंडलिक शिंदे (२३ मार्च १९९१)
www.facebook.com/pratik780
www.facebook.com/PatrickWritesLife
www.twitter.com/patrick0780
www.instagram.com/patrick.writes
आता हवा सहारा, अंधुक वाट आहे...
माहेर सोडताना, पंखात ऊब होती,
तोंडात घास माझ्या, डोळ्यात आस होती,
झेपलेला आकाशी, पक्षी मोकाट आहे,
आता हवा सहारा, अंधुक वाट आहे...!!
त्याला कसे कळावे, गर्भात देह ज्याचा,
नाही तुझे कुणी वा, नाही तुही कुणाचा,
रे तुझ्या आसवांचा, पाझर तूच आहे,
आता हवा सहारा, अंधुक वाट आहे...!!
वाटे उगी कळीला, मी एकदा फुलावे,
शोधीत भ्रमरांना, वाऱ्यासवे उडावे,
सुकल्या पाकळ्या या, दु:खित गात आहे,
आता हवा सहारा, अंधुक वाट आहे...!!
जीवनात कधी कुणाच्या, वेळा अशा न याव्या,
हसता हसता पहाटे, सांजा इथे न व्हाव्या,
उरलो जरी सखे मी, नुसताच भास आहे,
आता हवा सहारा, अंधुक वाट आहे...!!
- कुंडलिक शिंदे (२३ मार्च १९९१)
www.facebook.com/pratik780
www.facebook.com/PatrickWritesLife
www.twitter.com/patrick0780
www.instagram.com/patrick.writes
Kadddaakkkk.... Khup mhnje khup bhariii... 😇👍👍
ReplyDeleteThanks..😄
Delete