भास...
भिजलेल्या पापण्यांनी
संघर्ष लाख केले
पण मुक्या भावनांना
घरचीच आस आहे...
ही थंडगार संध्या
हा थंडगार वारा
हा दाटलेला कंठ
आठवण तुझीच आहे...
क्षितीजापरी दूर तू
मजला ते ज्ञात आहे
छळतो तरी मला का
तुझा आभास आहे...
माझ्या तुझ्या नशिबी
आहे जरी दुरावा
ओठांवरी आजही
तुझेच नाव आहे...
आली जरी पुन्हा तू
किस्साच खास आहे
आली जरी न पुन्हा
संघर्ष लाख केले
पण मुक्या भावनांना
घरचीच आस आहे...
ही थंडगार संध्या
हा थंडगार वारा
हा दाटलेला कंठ
आठवण तुझीच आहे...
क्षितीजापरी दूर तू
मजला ते ज्ञात आहे
छळतो तरी मला का
तुझा आभास आहे...
माझ्या तुझ्या नशिबी
आहे जरी दुरावा
ओठांवरी आजही
तुझेच नाव आहे...
आली जरी पुन्हा तू
किस्साच खास आहे
आली जरी न पुन्हा
किस्सा जुनाच आहे...
ज्या काळोखात न्हाले
नाते तुझे नी माझे
त्या काळोखास अजुनी
दरवळ तुझाच आहे...
उलटून रात्र गेली
केव्हा तरी पहाटे
परतूनी तूच आली
की तुझाच भास आहे...
तुझाच भास आहे...!!!
- प्रतीक कुंडलीक शिंदे (12 नोव्हेंबर 2017)
www.facebook.com/pratik780
www.facebook.com/PatrickWritesLife
www.twitter.com/patrick0780
www.instagram.com/patrick.cpp
ज्या काळोखात न्हाले
नाते तुझे नी माझे
त्या काळोखास अजुनी
दरवळ तुझाच आहे...
उलटून रात्र गेली
केव्हा तरी पहाटे
परतूनी तूच आली
की तुझाच भास आहे...
तुझाच भास आहे...!!!
- प्रतीक कुंडलीक शिंदे (12 नोव्हेंबर 2017)
www.facebook.com/pratik780
www.facebook.com/PatrickWritesLife
www.twitter.com/patrick0780
www.instagram.com/patrick.cpp
Pratik kadak👌👌
ReplyDeleteThanks :-)
Delete😍😍😍😘😘😘😘😘
ReplyDeleteThanks :-)
Delete&7;;@4 kadak
ReplyDeleteThanks 😀
Delete