पुन्हा एकदा...
ऐक ना गं तुला एक,
विचारायचं होतं,
विचारायचं म्हणजे एक,
मागणं होतं छोटं...
पुन्हा एकदा माझ्या,
स्वप्नांमध्ये येशील का,
पुन्हा एकदा लटकेच,
खुदकन हसशील का...
तुझं माझं माझं तुझं,
नातं असं गोड होतं,
लैला आणि मजनूच्या,
प्रेमालाही कोडं होतं....
केस तुझे काळेभोर,
आणि बट चेहऱ्यावर,
पुन्हा एकदा मला,
सावरू देशील का....
पुन्हा एकदा खुदकन हसशील का...
ठेच कधी लागली ही,
जोडीने चालताना,
आले कधी रुसवे हे,
गोडीने बोलताना...
फुगलेले गाल तुझे,
रुसलेले ओठ तुझे,
पुन्हा एकदा मला,
चुंबून देशील का....
पुन्हा एकदा खुदकन हसशील का...
विचारायचं होतं,
विचारायचं म्हणजे एक,
मागणं होतं छोटं...
पुन्हा एकदा माझ्या,
स्वप्नांमध्ये येशील का,
पुन्हा एकदा लटकेच,
खुदकन हसशील का...
तुझं माझं माझं तुझं,
नातं असं गोड होतं,
लैला आणि मजनूच्या,
प्रेमालाही कोडं होतं....
केस तुझे काळेभोर,
आणि बट चेहऱ्यावर,
पुन्हा एकदा मला,
सावरू देशील का....
पुन्हा एकदा खुदकन हसशील का...
ठेच कधी लागली ही,
जोडीने चालताना,
आले कधी रुसवे हे,
गोडीने बोलताना...
फुगलेले गाल तुझे,
रुसलेले ओठ तुझे,
पुन्हा एकदा मला,
चुंबून देशील का....
पुन्हा एकदा खुदकन हसशील का...
- प्रतीक कुंडलीक शिंदे
Chhan
ReplyDeleteThanks :-)
ReplyDelete