सखे...
तुझ्या माझ्या कहाणीला
मोगऱ्याचा वास गं..
सखे दिन रात तुझा
होतो मला भास गं...
काळ्याकुट्ट ढगालाही
गारव्याची साथ गं..
सखे माझ्या हाती कधी
देशी तुझा हात गं...
काळेभोर केस तुझे
जशी होई रात गं..
सखे जगायला हवी
फक्त तुझी साथ गं...
डोळे तुझे हरणावानी
वाघिणीचा घात गं..
सखे नजर एक तुझी
माझ्यावरी मात गं...
ओठ तुझे मोसंबीची
रसभरी फोड गं..
सखे मला लागलीया
आंबटाची ओढ गं... -- reference by पिंपळाचं पान
बोलणं ते जसं तुझं
कोकिळेचे बोल गं..
सखे माझ्या कानालाही
ओढ त्याची खोल गं...
चाल तुझी तुरुतुरु
माझी कर कीव गं..
सखे आता मजणूचा
घेती का हा जीव गं...
- प्रतीक कुंडलीक शिंदे (17 ऑक्टोबर 2017)
www.facebook.com/pratik780
www.twitter.com/patrick0780
www.instagram.com/patrick.cpp
Comments
Post a Comment