तू...
मी होऊनी स्वच्छंदी,
डोळ्यांत तुझ्या डुंबावे,
जाळीने पापण्यांच्या,
तू मजला स्वैर जपावे...
मी गुलाब व्हावा साधा,
अन हवेत आरूढ व्हावे,
तू हळूच जवळी घ्यावे,
केसांत मला माळावे...
मी व्हावे डुल कानाचे,
तू जवळ मजला घ्यावे,
मी आरूढ होईल कानी,
तू खुशाल मज मिरवावे...
मी नाजूक पैंजण व्हावे,
अन छुमछुम गाणे गावे,
तू सजवून मजला पायी,
सूर माझे अलगद गावे...
मी सुंदर व्हावी लाली,
तू मजवर प्रेम करावे,
शृंगार करुनी पुन्हा,
ओठांवर मज सजवावे....
- प्रतीक शिंदे (१८ मे २०१७)
www.facebook.com/pratik780
www.instagram.com/patrick.cpp
www.twitter.com/patrick0780
डोळ्यांत तुझ्या डुंबावे,
जाळीने पापण्यांच्या,
तू मजला स्वैर जपावे...
मी गुलाब व्हावा साधा,
अन हवेत आरूढ व्हावे,
तू हळूच जवळी घ्यावे,
केसांत मला माळावे...
मी व्हावे डुल कानाचे,
तू जवळ मजला घ्यावे,
मी आरूढ होईल कानी,
तू खुशाल मज मिरवावे...
मी नाजूक पैंजण व्हावे,
अन छुमछुम गाणे गावे,
तू सजवून मजला पायी,
सूर माझे अलगद गावे...
मी सुंदर व्हावी लाली,
तू मजवर प्रेम करावे,
शृंगार करुनी पुन्हा,
ओठांवर मज सजवावे....
- प्रतीक शिंदे (१८ मे २०१७)
www.facebook.com/pratik780
www.instagram.com/patrick.cpp
www.twitter.com/patrick0780
bhari
ReplyDeleteThanks :)
Deleteसुंदर...!!!
ReplyDeleteThanks :)
DeleteKdk re bhava 😘 😘 😘 😘 😘
ReplyDeleteWow
ReplyDeleteThanks 😀
DeleteVery nice...😍😍😘😘😘
ReplyDeleteThanks 😀
Delete